फोटोग्राफर विकास मंचने जपली माणुसकी... छायाचित्रण दिनादिवशी दिला जेष्ठ फोटोग्राफरला आधार!

पंढरपूर LIVE 20 आॅगस्ट  2018





 
उमेदीच्या काळात प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाला साथ देणारे असंख्य सोबती असतात. परंतु जेंव्हा माणुस असहाय बनतो, निराधार बनतो तेंव्हा मात्र अशा माणसाची सावली सुध्दा त्याची साथ देत नसते असे म्हणतात. परंतु पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाने या कल्पनेला छेद देत माणुसकीचं एक मन हेलावून टाकणारं दर्शन जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने घडवून दिलंय. उपासमारीची वेळ आलेल्या एका जेष्ठ छायाचित्रकाराला कॅमेरा भेट देऊन स्वावलंबी बनून जगण्यासाठीचं बळ देण्याचं महान कार्य पंढरपूर फोटोग्राफर संघाने केलंय.

‘एक छायाचित्र हजार शब्द बोलते,’ असे म्हटले जाते. सोलापूरमधील फोटोग्राफर राजू स्वामी उर्फ शिवबाबा यांचे सोबतचे छायाचित्रही तसेच बोलके आहे. काही कारणामुळे सर्वस्व हरवून उपासमारीची वेळ आलेल्या या ज्येष्ठ फोटोग्राफरची दैना न पाहवून त्यांना जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून कॅमेरा भेट देण्यात आला. त्यामुळे त्यांना नवे जीवन सुरू करता येणार आहे. पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाने अत्यंत संवेदनशीलपणा दाखवून अनोख्या पद्धतीने छायाचित्रण दिन साजरा केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments