अनैतिक संबंधास अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खुन... सांगोला तालुक्यातील घटना

पंढरपूर LIVE 18 आॅगस्ट  2018

अनैतिक संबंधास अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने दि. 5 ऑगस्ट रोजी खुन केला व हा अपघात असल्याचा बनाव केला होता. गौडवाडी ता. सांगोला येथील बुध्देहाळ तलावाच्या सांडव्याजवळ ही हत्या झाली होती. याबाबत पोलिसांनी तातडीने तपासाची सुत्रे फिरवून आरोपी पत्नी, प्रियकर व त्याचा सहकारी असे तिघांना जेरबंद करुन शुक्रवार 17 ऑगस्ट रोजी आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, विलास शेटे वय 48, रा. कोळा यांना 5 ऑगस्ट रोजी गौडवाडी येथील बुध्देहाळ तलावाच्या सांडव्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यु झाला अशी फिर्याद सांगोला पोलिसात दाखल करण्यात आली होती. परंतु हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मयताचा भाऊ भारत शेटे यांनी व्यक्त करीत या गुह्याची चौकशीची मागणी केली होती.

त्याप्रमाणे सदर गुह्याचा तपास ग्रामीणचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागिय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजकुमार केंद्रे व सपोनि अमुल कादबाने यांनी केला. आणि अवघ्या 10 ते 12 दिवसात गुह्याचा छडा लावला.

मयत विलासची पत्नीचे गावातील सायाप्पा सरगर बरोबर अनैतिक संबंध होते. यामुळे त्या पतीपत्नीत वादविवाद होत होता. विलास हा पत्नीला अनैतिक संबंध बंद करण्याबाबत वारंवार सांगून देखील पत्नी ऐकत नसल्याने त्यांच्यातील भांडण वाढत गेले.

दरम्यान पत्नीला अनैतिक संबंधात पतीचा अडसर होवु लागल्याने तिने आपला प्रियकर सायाप्पा व त्याचा जोडीदार समाधान करचे यांच्या मदतीने पती विलासला संपविण्याचा कट रचला आणि 5 ऑगस्ट रोजी प्रियकाराच्या मदतीने मयत विलास हा त्याच्या गाडीवरुन जाताना त्याच्या अंगावर वाहन घालुन त्याचा खुन केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अपघाताचा बनाव केला. त्यानंतर पोनि राजकुमार केंद्रे व सपोनि अमुल कादबाने यांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवत गुन्हा उघडकीस आणला.

आरोपी पत्नी, सायाप्पा व समाधान यांना जेरबंद करुन तपास करीत पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी मयत विलासचा खून केल्याचे कबूल केले. गुन्हा अनैतिक संबंधातून झाला असून या गुह्यात अजुनही आरोपी असतील तर त्यांची नावे तपासात निष्पन्न होणार आहेत.

सदर आरोपींवर 302, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या गुह्याचा अधिक तपास करण्यासाठी आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments