सोशल मिडियाच्या बाबतीत मुलांमध्ये मध्ये संवाद होणे गरजेचे आहे -प्राचार्य डॉ. कैलाश करांडे

पंढरपूर LIVE 13 आॅगस्ट  2018


पंढरपुर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत
   पंढरपूर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यानी त्यांच्या मनातील स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी समाज्याच्या अपेक्षा लक्षात घेऊन इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले पाहिजे, या चार वर्षात तुम्ही तुमच्या आयुष्यातील जीवनाला यशाच्या शिखरावर पोहचाल. इंजिनीअरिंगचे शिक्षण म्हणजे चांगल्या कंपनीत नोकरी आणि मोठ्या पगाराची नोकरी म्हणजे करिअर नव्हे तर आजच्या युगात टेक्नॉलॉजी दररोज बदलत आहे यासाठी स्वत:ला अपडेट ठेवले पाहिजे. स्वतःकडे संभाषण कौशल्य, आत्मविश्वास तसेच स्वतःचे वेगळेपण सिद्ध करता आले पाहिजे. विद्यार्थी द्सेतच स्वप्नाची वाटचाल केली तरच यश मिळेल. विद्यार्थ्याना इंजिनीअरिंग मध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत त्या संधीचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. पुढील चार वर्षात तुम्ही अभ्यास केला तर येणाऱ्या काळातील परीक्षा तुम्ही आत्मविश्वासाने द्याल. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करा, वेळेचा सदुपयोग करून मेहनत घेतली तर यश निश्चीत मिळेल. आजच्या युवकापुढील आव्हाने खूप आहेत. युवा वर्गात फेसबुक आणि व्हटसप सारख्या सोशल मिडीयाचा वापर सध्या जास्त होत आहे. चांगल्या कामासाठी त्याचा वापर करणे गरजेच असून पालकांनी याबाबत जागृत असले पाहिजे आणि सोशल मिडियाच्या बाबतीत मुलांमध्ये मध्ये संवाद होणे गरजेचे आहेअसे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना व पालकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
       कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीत मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती  प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
  या कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रथम वर्ष अभियांत्रिकी चे विभाग प्रमुख प्रा, अनिल निकम, प्रा. शिवाजी पवार पालक प्रतिनिधी नागेश भादुले व पदमाकर आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी विद्यार्थ्यांची वर्गात उपस्थिती खूप महत्वाची आहे, आपला मुलगा महाविद्यालयात घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धेत सहभागी होतो का? हे पालकांनी पाहणे गरजचं असून विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास केल्यास इंजिनीअरिंगचे शिक्षण खूप सोपे आहे. पालकांनी महाविद्यालयात घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षेचे मार्कस मोबाईल वर  एसमेस द्वारे पाठविण्यात येत असल्याचे प्रा. अनिल निकम यांनी सांगितले. यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले सौरभ प्रसन्न मोहोळकर या विद्यार्थ्यांने बँकॉक मध्ये घेण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल मान्यवराच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला
         हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सुषमा कोडगिरी सह महविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कुमारी ज्योत्स्ना राऊत यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार कुमारी संध्या घाडगे यांनी मानले.
फोटो ओळी:- कोर्टी (ता. पंढरपूर) सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीत 



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments