कन्या प्रशालेत उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पंढरपूर LIVE 18 आॅगस्ट  2018


सांगोला/प्रतिनिधी :
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक कन्या प्रशालेत भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
यावेळी, संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे, सचिव .निलकंठ शिंदे, संगमेश्वर साळुंखे, मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे, लेखिका योजनाताई मोहिते यांची प्रमुख उपस्थित होती. 
सुरुवातीस बामणीचे पालक संगमेश्वर साळुंखे यांच्या हस्ते प्रशालेतील ध्वजारोहण करण्यात आले. नंतर कु.साक्षी येडगे, कोमल जाधव, आर्यन सुर्यगण, सिध्दी मोहिते, गौरव उबाळे, अमृता साळुंखे, साक्षी खडतरे, मोनाली जाधव, मनिषा माने, चॉंदबी मुजावर, दीपाली पवार, शीतल दहिवडकर, या सर्व विद्यार्थीनींनी देशभक्तीपर स्वातंत्र्य दिना निमित्त भाषणे केली. 
प्रशालेतील अनेक समुह विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.10 vi मार्च 2018 परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविलेल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना संस्थापक कै.वामनराव शिंदे, कै.गोदाताई घोरपडे, कै.सुनील विश्वनाथ पाटील, यांच्या स्मरणार्थ विविध रोख पारितोषिके बक्षिसे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. ध्वजारोहणास मानवदंना संभाजी बिले यांनी दिली. 
या सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सुवर्णा इंगवले यांनी केले. शेवटी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना संगमेश्वर साळुंखे, योजनाताई मोहिते, श्रीमती फातिमा जहॉंगीर मुलाणी यांनी खाऊचे वाटप केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 
-----------------
शहीद कामटे संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा
सांगोला/प्रतिनिधी :
येथील शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना(रजि.)सांगोला यांच्या वतीने भारतय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात अध्यक्ष संदीप बनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाची मानवंदना शिंदे यांनी दिली. यावेळी अच्युतराव फुले, चैतन्य राऊत, ओंकार देशपांडे, रविंद्र कुलकर्णी, शहाजी पाटील, लिगाडे यांच्यासह बहुसंख्येने सदस्य यावेळी उपस्थित होते. 



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments