पंढरपूर LIVE 28 सप्टेंबर 2018
सुयोग्य प्रशासनासाठी आपल्या एका मताची गरज– प्रांताधिकारी सचिन ढोले.
पंढरपूर- ‘सुयोग्य प्रशासन चालविण्यासाठी आपल्या एका मताची आवश्यकता असते. यामुळे योग्य प्रतिनिधी निवडून येऊन नेतृत्व करू लागतो. त्या नेतृत्वावरच आपला विकास अवलंबून असतो. यासाठी आपल्या भागाचा योग्य विकास करण्यासाठी आपला प्रतिनिधी कसा असावा? याची चर्चा करण्यापूर्वी प्रथम आपली प्रमुख जबाबदारी पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या विकासाला व अधोगतीला आपणच जबाबदार असतो. यासाठी आपल्या एका मताचे महत्व खूप असते. मोठा बदल देखील आपल्या एका मताने घडू शकतो. यासाठी प्रथम आपले नाव मतदान यादीत नोंदणे आवश्यक आहे. यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंद करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ संपूर्णपणे भरावा. त्यानंतर त्याचे नाव मतदार यादीत प्रसिद्ध होईल. त्यानंतर त्याला निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी निवडणूक मतदान करण्यासाठी सर्वप्रथम मतदान यादीमध्ये नाव नोंदणी करावी.’ असे आवाहन पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी केले.
२५२, पंढरपूर विधानसभा मतदार संघ व स्वेरीचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमधील आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजिलेल्या ‘मतदार प्रबोधन विशेष कॅम्प’ मध्ये पंढरपुरचे मतदान निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी ढोले हे मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी स्वेरीतील अभियांत्रिकी व फार्मसीच्या विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करत होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी ‘मतदार प्रबोधन विशेष कॅम्प’ ची माहिती देवून मतदान यादीत नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पुढे बोलताना प्रांताधिकारी ढोले म्हणाले की, ‘ज्यांचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे पूर्ण होत आहे त्यांनी भविष्यकाळात होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी मतदार यादीत आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म क्रमांक ६ भरावा.यासाठी स्वेरीमध्ये नाव नोंदणी केंद्र स्थापन केले असून आपले प्रॉक्टर टीचर्स आणि वर्गशिक्षक याच्याकडे ‘ऑनलाईन’ अथवा ‘ऑफलाईन’ फॉर्म भरावा. या प्रक्रियेची अधिक माहिती टोल फ्री क्रमांक १९५० तसेच https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर मिळू शकते. ज्यांचे नाव मतदान यादीत नाहीत, परंतु वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करणे आवश्यक असून संपूर्ण भारतभर हा उपक्रम १ सप्टेंबर२०१८ पासून राबविला जात असून ३१ आक्टोंबर २०१८ पर्यंत चालणार आहे. लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड अथवा शाळेचा दाखला याची प्रत अर्जासोबत जोडावी. स्वेरीची यंत्रणा ही प्रसाशासनाला सातत्याने सहकार्य करते. यावेळी देखील प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी स्वेरीत मतदान यादीत नाव नोंदणीसाठी केंद्र स्थापन केले आहे.’ असे ढोले यांनी सांगितले. यावेळी निवडणूक निर्णय प्रक्रियेची संकेतस्थळ, फॉर्म भरवायची पद्धत हे व्हिडीओ क्लिपद्वारे महत्वाची माहिती दिली. यावेळी ‘प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांकडून मतदार यादीत नाव नोंदणी करून घेण्याची प्रक्रिया सुरु असून याची सविस्तर आकडेवारी प्रशासनाला वेळोवेळी सादर केली जाईल.’ असेही प्राचार्य डॉ. रोंगे यांनी सांगितले. यावेळी मंडल अधिकारी समीर मुजावर, गोपाळपूरचे तलाठी खंडेराव गायकवाड, गुर्जर यांच्यासह डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, उपप्राचार्य प्रा. एस.एन. कुलकर्णी, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, वसतिगृह व्यवस्थापक प्रा. एम.एम.पवार, रा.से.योजनेचे अधिकारी डॉ. आर.एन.हरिदास, प्रा. एस.एम.शिंदे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच अभियांत्रिकी व फार्मसीमधील प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षातील जवळपास एक हजार विद्यार्थी उपस्थित होते.प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले व आभारही मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments