पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथे वाळु चोरट्यांची पिकअप गाडी वाळुसह जप्त... पंढरपूर तालुका पोलिसांची कामगिरी

पंढरपूर LIVE 4 ऑक्टोबर 2018



दि.03/10/2018 रोजी  नेपतगाव ता पंढरपुर गावचे हद्दीतील माण नदीचे पात्रातुन वाळु चोरणाऱ्या चोरट्यांची बोलेरो पिकअप गाडी त्यातील चोरलेल्या वाळुसह (एकुण 3 लाख दोन हजार रू. चा मुद्देमाल)  पोलिसांनी ताब्यात घेतलीय. 
 काही इसम वाळु चोरी करून घेवुन जात आहेत अशी माहिती मिळताच पंढरपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी  डाॅ.सागर कवडे सो यांनी पोना/989 रूपनर, पोकाॅ/918 भांगे, पोकाॅ/2110 हुलजंती यांना सदर ठिकाणी जावुन कारवाई करीता पाठविले. असता वरील पोलीस स्टाफ खाजगी वाहनाने मौजे नेपतगाव ता पंढरपुर गावचे हदद्ीतील माण नदीचे पात्राजवळ जावुन त्यांचे ताब्यातील खाजगी वाहन माण नदी पात्राचे अलीकडे उभे करून बातमीप्रमाणे माण नदीचे पात्रात गेले असता काही लोक एका वाहनात वाळु भरीत असलेचे दिसले. वरील पोलीस स्टाफ सदरचे वाहन व वाळु भरणारे इसमांना पकडणेकरीता जात असताना पोलीस स्टाफची चाहुल यातील इसमांना लागताच वाळु भरत असलेले इसम त्यांचे ताब्यातील पिकअप वाहन जागीच सोडुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. ती वेळ पहाटे 04ः00 वाजणेची होती. सदर वाहनाचे जवळ जावुन पाहता ते बोलेरो पिअकप असुन त्याचे वर्णन खालीलप्रमाणे-

1) 3,02,000/- त्यात एक पांढरे रंगाचे बोलेरो पिकअप त्याचा नं एम एच 04 ई बी 3212  खोडलेल्या स्थितीत असुन, त्याच्या हौदयात अर्धा ब्रास वाळु असलेली वाळुसह कि अं. 
===============
   3,02,000/-
येणेप्रमाणे वरील वर्णनाचा पिकअप व त्यामधील वाळु वरील पोलीस स्टाफने ताब्यात घेवुन ती पंढरपुर तालुका पोलीस ठाणेस आणुन लावुन पोकाॅ/2110 षिवषंकर सोमन्ना हुलजंती यांनी वरील पिकअप वाहनाचे चालक व मालक यांचेविरूध्द त्यांनी माण नदीचे पात्रातुन अवैध विनापरवाना , शासनाची पर्यावरणाला उपयुक्त अशी गौणखनिज वाळु ही पर्यावरणाचा ऱ्हास  होईल हे माहीत असताना देखील चोरून वाळु उपसा करून ती वरील पिकअप मध्ये भरून चोरून घेवुन जात असताना पोलीस पथकास पाहुन त्यांचे ताब्यातील बोलेरो पिकअप जागीच सोडुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले म्हणुन त्यांचेविरूध्द पंढरपुर तालुका पोलीस ठाणेस भा.द.वि.सं.क. 379,34 पर्यावरण कायदा कलम 9,15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयाचा पुढील तपास पोहेकाॅ/1462  गोळे हे करीत आहेत. 

(सदरची कारवाई ही मा.पोलिस अधिक्षक श्री.मनोज पाटील सोा सोलापुर ग्रामीण ,मा.अप्पर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते सोा सोलापुर ग्रामीण ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.डाॅ.सागर कवडे सोा,पंढरपुर उपविभाग पंढरपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोना/989 रूपनर, पोकाॅ/918 भांगे, पोकाॅ/2110 हुलजंती यांनी केलेली आहे.








  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments