पंढरपूर LIVE 22 ऑक्टोबर 2018
दुधात भेसळ करणार्या मंगळवेढा तालुक्यातील एका दुध संकलन केंद्रावर अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली असून सदर दुध संकलन केंद्राच्या मालकाच्या घरातुन दुध भेसळीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याबाबत अधिकृत माहिती अशी की, दिनांक 22/10/2018 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मु.पो. गुंजेगाव, ता.मंगळवेढा येथील सतीश रेड्डी यांचे मालकीचे मे. विजया महिला दूध संकलन केंद्र या ठिकाणी धाड टाकली. सदर ठिकाणी दूध भेसळीबाबत संशयित दुधाचा साठा आढळून आला. अधिक सखोल चौकशीअंती पेढी मालकाच्या घरी तपासणी केली असता तेथे Whey Permeate Powder चे 3 पोते प्रत्येकी 25 kg चे आढळून आले. त्यानंतर पेढीतून गाय दूध, म्हैस दूध व पावडर यांचे नमुने घेऊन उर्वरित गाय दूध- 998 लिटर दुध, किंमत रुपये- 24950/-, म्हैस दूध- 198 लिटर, किंमत रुपये 6930/- व पावडर किलो- 73 kg, किंमत रुपये- 9000/- चा साठा अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नुसार जप्त करून ताब्यात घेतला.
दूध हे नाशवंत असल्याने व भेसळीच्या संशयावरून ते 1196 लिटर घटनास्थळीच नष्ट केले. सदर पेढीने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे परिशिष्ट 4 चे उल्लंघन केलेलें असल्याने व भेसळयुक्त दूध स्वीकारल्याचे तसेच भेसळ करीत असल्याच्या संशयावरून पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ बंद करण्यात येत आहे. तसेच सदर पेढीची परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येत आहे. सदर ची कारवाई श्री प्रदीप राऊत, सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मंगेश लवटे यांनी श्री डॉ योगेश देशमुख व श्री डॉ उमेश भुसे यांच्या सहकार्याने पूर्ण केली.. सदर ची कारवाई रात्री 8.00 वाजता सुरू होऊन रात्री 01.30 वाजता संपली..
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments