पंढरपूर LIVE 3 ऑक्टोबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) आपण कोणत्या घरात जन्माला यायचे हे आपल्या हातात नसते परंतु ज्या घरात जन्माला आलो त्या घराचे नाव कमवायचे हे आपल्या हातात असते. समाजात अनेक जण छोट्या-छोट्या व्यवसायातून मोठे नाव मिळविलेले पुष्कळ जण आहेत. यामध्ये अनेक व्यक्ती स्वतः जवळ पैसे नसताना ही व्यवसाय सुरू केलेले भरपूर जण आहेत. वास्तविक पाहता स्वतः कडे पैसे असताना व्यवसाय करणारे खुप जण आहेत माञ पैसे नसताना व्यवसाय करणारे खुप कमी आहेत. तुम्ही कोणताही व्यवसाय करीत असताना त्या व्यवसायाची सर्व बाजूंनी माहिती घेणं आवश्यक आहे. सुरवातीला छोटा उद्योग धाडसाने सुरू करा नशिब तुम्हाला पुढे निश्चित साथ देईल. व्यवसाय करीत असताना जी गोष्ट येत नाही किंवा समजत नाही तीच गोष्ट वारंवार समजून घेतली पाहिजे. व्यवसाय करीत असताना तुमच्या प्रत्येक निर्णयाला खुप महत्व असते, तो निर्णय योग्य घेऊन धाडसाने पुढे पाऊल टाकले पाहिजे. तुम्ही जो उद्योग उभा केला आहे त्या उद्योगासाठी लागणारे मनुष्यबळ हे निर्व्यसनी असले पाहिजे. त्या कर्मचा-यांना शैक्षणिक व दैनंदिन सोई-सुविधा उपलब्ध करून देणे खुप महत्वाचे आहे. आयुष्य सहज आहे ते फक्त मानण्यावर आहे. व्यवसाय करीत असताना प्रत्येक गोष्टी ह्या ठरवाव्या लागतात, तुम्ही तुमच्या व्यवसायाबाबत मोठी स्वप्ने पाहा आणि त्यासाठी निस्वार्थपणे प्रामाणिक पणे कष्ट घ्या. व्यवसायामध्ये स्पर्धा हि स्वत: बरोबर असावी, कारण या समाजाचे आपण काही तरी देणं लागतो म्हणून नोकरी च्या मागे न लागता व्यवसाय उभे करून तुम्ही नोकरी देणारे मालक व्हा आणि भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी हाथ भार लावा असे मत उद्योजक अभिजीत पाटील यांनी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून "उद्योजक व्हा" या विषयावर उद्योजक अभिजीत पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे, उद्योजक अभिजीत पाटील, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. माळी आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
सिंहगड महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नोकरी च्या मागे न धावता स्वत:चा व्यवसाय सुरू करून उद्योग क्षेत्रात आपले करिअर करावे यासाठी त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अभिजीत पाटील यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ ठिगळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी मानले.
फोटो ओळी:- पंढरपूर सिंहगड मध्ये "उद्योजक व्हा" या विषयावर अभिजीत पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे, डॉ. रविंद्र व्यवहारे, माळी साहेब, समोर उपस्थित विद्यार्थी.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments