वारकर्‍यांसाठी संहिता तयार करावी -बोधले

पंढरपूर LIVE 26 ऑक्टोबर 2018


पंढरपुरात वारकरी पाईक उत्सव संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) : श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज हजारो तर यात्रा कालावधीत लाखो भाविक येतात. भाविकांच्या सोयीसाठी महाराज मंडळींनी प्रयत्न करावेत. यासाठी वारकर्‍यांची एक वारकरी संहिता तयार व्हावी, असे विचार ह. भ. प. जयवंत महाराज बोधले यांनी व्यक्त केले.


वारकरी सांप्रदायाची परंपरा जतन होणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण वारकरी सांप्रदाय एकत्रीत यावा याकरिता वारकरी सांप्रदाय पाईक संघाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून पांडुरंग भवन याठिकाणी वारकरी पाईक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ह. भ. प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर, ह. भ. प. रामभाऊ महाराज राऊत उपस्थित होते.




 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. राणा महाराज वासकर होते. यावेळी मार्गदर्शन करताना ह. भ. प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर म्हणाले, वारकरी सांप्रदाय हा अक्षय वटवृक्ष आहे व पाईक संघ हा वटवृक्षाच्या पारंब्या आहेत. वारकरी सांप्रदायात येणार्‍या अडचणीवर पाईक संघाने मात करावी यासाठी योग्य नियोजन करावे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी ह. भ. प. रामभाऊ महाराज राऊत म्हणाले, पंढरपूरमध्ये श्री संत नामदेव महाराजांचा समाधी उत्सव भव्य स्वरूपात व्हावा याकरिता पाईक संघाने प्रयत्न करावे. याप्रसंगी 


चित्रफितीद्वारे पाईक संघाच्या कार्याचा आढावा सादर करण्यात आला.
या उत्सवाला समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना, विश्र्व वारकरी सेना, शिव प्रतिष्ठान, पेशवा युवा मंच, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, महर्षी वाल्मिकी संघ, परशुराम युवा मंच, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती, शिव प्रेमी तरुण मंडळ, समस्त बाराभाई तालीम या सर्व संघटनांचे पदाधिकारी व अनेक जिल्ह्यांतून पाईक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह. भ. प. वीर महाराज यांनी, तर सूत्रसंचालन वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते ह. भ. प. विठ्ठल महाराज पैठणकर यांनी केले. 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments