पंढरपूर LIVE 25 ऑक्टोबर 2018
वरिष्ठ पो. नि. गवळी यांनी साधला स्वेरीच्या विद्यार्थ्यांशी मुक्तसंवाद
पंढरपूर –(संतोष हलकुडे ) ‘आज कालची काही तरुण मुले ही जिथे अपार मेहनत घेणे गरजेचे आहे तिथे जीवन मौज मजेत घालवत आहेत, अधिकाधिक मनोरंजन कसे होईल? याकडे काही विद्यार्थी, तरुण अधिक लक्ष देत आहेत. याला आताच आवरणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी पोलिसांविषयी मनात कोणतीही भीती न बाळगता त्यांच्याबरोबर मुक्तपणे संवाद साधावा. तरुण पिढीने वायफळ वेळ न घालवता समाज प्रबोधन, विधायक कार्य करावे. त्यामुळे समाजाला त्रास होणार नाही आणि समाजात देखील आपल्या स्त्युत्य कार्यामुळे आपुलकीची भावना निर्माण होईल आणि हातून घडणाऱ्या कार्याला अधिक उर्जा मिळेल. असे करताना कायद्याच्या मर्यादा मात्र ओलांडू नका.’ असा मौलिक सल्ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिला.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे व.पो.नि गवळी ‘विद्यार्थ्यांशी संवाद आणि कायद्याबाबत मार्गदर्शन’ करण्यासाठी आले होते. यावेळी ते कायदा, गुन्हेगारी, सामाजिक कार्य, वाहन परवाना , वयाच्या अटी, यांच्यासह अनेक महत्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करत होते. स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार यांनी त्यांचे स्वागत केले. पुढे बोलताना पो.नि. गवळी म्हणाले की, ‘पोलिसांविषयी आपण जर भीती बाळगत असाल तर हा पोलीस खात्याचा पराभव आहे. त्यामुळे पोलिसांना आपले समजून त्यांच्याकडे सदैव सकारात्मक नजरेने पाहून त्यांना सहकार्य करावे. या अतूट संबंधांमुळे समाजात वाढत जाणारी गुन्हेगारी कमी होण्यास मदत मिळेल. सण, उत्साह, सामाजिक, राजकीय कार्यक्रम,यासाठी पोलिसाना सदैव तत्पर राहावे लागते.कधी कधी व्यस्त कामामुळे कुटुंबातील व्यक्तीपासून दूर राहावे लागते. पोलिसाना वेळप्रसंगी सलग अठरा अठरा तास काम करावे लागते. यामुळे ते आपला परिवार, कौटुंबिक कार्यक्रम यापासून अनेकवेळा वंचित राहतात. त्यामुळे पोलिसांची मानसिकता समजून घेण्यासाठी पोलीस हे आपल्यातील एक आहे असे समजून सहकार्य करीत रहा. आपण आपल्या घरापासून महाविद्यालयात येईपर्यंत वाटेत काहीही अघटीत घटना दिसून आली अथवा घडत असेल तर आपण वेळ न घालवता त्वरित जवळच्या पोलिसाना सदरच्या घटनेची कल्पना द्या.पुढील कार्यवाही पोलीस यंत्रणा करेल.’ असे सांगून पुढे ते म्हणाले की ‘सचिव व प्राचार्य डॉ बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीतील शिस्त पाहता येथील विद्यार्थ्यांना आणखी काही सांगावे लागणार नाही. स्वेरीतील शिस्तीचा पोलीस खात्याला अभिमान वाटतो. तुमचे कॅम्पस सुरक्षित आहे परंतु कॅम्पस बाहेर कुठेही आपल्याला त्रास देणारा, छेडछाड करणारा, अपरिचित ठिकाणी फसवणूक करणारा लफंगा, आकारण त्रास देणारा युवक, गुंड यांचा जर त्रास होत असेल तर त्वरित मला (मोबा. नं. ७०२०८६३५५०) कॉल करा. कोणीही असो त्यांचे मुसक्या आवळण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर आहे.’ असे त्यांनी स्वेरीतील तसेच शहरातील महाविद्यालयीन तरुणींना आणि महिलांना आवाहन केले. पो. नी. गवळी आणि विद्यार्थी आपसात संवाद साधत असताना विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी ‘पोलीस व कायदा सुव्यवस्था’ या विषयावर अनेक प्रश्न विचारले असता पो.नि. गवळी यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी स्वेरीचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील,प्रा. अमोल चौंडे, अधिष्ठाता, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी.व प्रथम वर्षाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments