आढीव येथील डेंग्यूसदृश्य तापाने एकाच घरातील दोघांचा मृत्यू

पंढरपूर LIVE 30 ऑक्टोबर 2018



आढीव : पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील ३९ वर्षीय युवकाचा डेंग्यू सदृश्य तापाने मंगळवारी रात्री मृत्यू झाला मिरज येथील खाजगी रुग्णालयात त्याच्या वर उपचार करण्यात येत होते. 
गेल्याच आठवड्यात त्याचाच लहान भाऊ शिवाजी मारूती धाकतोडे  वय.३७ यांचा सोलापूर येथील खाजगी हाॅस्पीटल मधे मुंत्यु झाला होता तोच आज शाहाजी मारूती धाकतोडे या मोठा भावाचा सुधा या डेंगू च्या तापाने मुंत्यू झाला.
आढीव ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे गावात कमालीची घाण साचलेली आहे. गावाच्या चारी दिशेने आजही हागणदारी आहे.सचलेले पाणी तुंबलेल्या गटारी याबाबत दै.पुढारी ने सतत वृत्त प्रसिद्ध केला. पण झोपी गेलेला आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन जागे झाले नाही. यामुळे गावात रोगराई वाढली आहे. 

एकाच घरातील शिवाजी मारूती धाकतोडे आणि शहाजी धाकतोडे  या दोघां भावांना आपल्य प्रनांना मुकावे लागले आहे. मागील  दोन महिन्या पाषून गावात डेंगू सदृश्य रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत परंतू आढीव ग्रामपंचायती कडून या साठी कोणतेही ठोस असे उपाय योजना राबवन्यात येत नाहीत.
पाच सहा दिवसांपासून थंडी-ताप व डोके दुखीचा त्रास होता. त्याना स्थानिक दवाखान्यासह पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार देखील घेतले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना सोमवारी (दि.२९) मिरज येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरु असताना त्याचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. 

या दोन्ही मुत्यु आढीव ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांनी त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे लक्षण दिसून येत होती असे स्पष्ट केले.

आता तरी आढीव ग्रामपंचायत आणि रोपळे आरोग्य विभाग जागा होईल का नुस्ते मिंटीगा चर्चा घेऊन काय होणार नाही त्या साठी ठोस असे उपाय योजना करण्यात याव्याता आणि आणखीन किती बळी घेणार असे उलट सुलट चर्चा आढीव सह परिसरात बोलल्या जाऊ लागल्या आहेत.











महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments