फुलचिंचोली येथील समता गौरव पुरस्कार जाहीर! पत्रकारितेचा पुरस्कार पत्रकार प्रमोद बनसोडे यांना जाहीर... विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते 1 डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा

पंढरपूर LIVE 24 नोव्हेंबर 2018

पत्रकार प्रमोद बनसोडे (सर)

 पंढरपूर (प्रतिनिधी) अखिल भारतीय  भा महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली यांच्या वतीने देण्यात येणार्‍या समता गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारामध्ये पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार दै.पुढारी चे प्रतिनिधी पत्रकार प्रमोद बनसोडे (सर) यांना जाहीर करण्यात आला आहे.  महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे पुरस्कार दिले जातात.1 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.00वाजता फुलचिंचोली(ता पंढरपूर)येथे जि. प.प्रा. शाळेच्या प्रांगणात या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार असल्याची माहिती समता परिषदेचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी दिली.

यावर्षीचा कला क्षेत्रातील पुरस्कार लागीर झालं जी फेम,मामीची भूमिका करणार्‍या सौ.विद्या सावळे(बार्शी),सामाजिक पुरस्कार जी एम ग्रुप सोलापूरचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे ,शैक्षणिक पुरस्कार सावित्री कस्तुरे(सांगोला),कृषी पुरस्कार प्राचार्य सीताराम रणदिवे(तुंगत),पत्रकारिता दै पुढारीचे प्रतिनिधी प्रमोद बनसोडे,साहित्य पुरस्कार शशिकांत जाधव(मंगळवेढा)   यांना समता गौरव पुरस्कार 2018जाहीर करण्यात आले आहेत.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार समीर(भाऊ)भुजबळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भारत(नाना)भालके,महामंडळचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ,माजी आमदार राजन पाटील,पुणे जि.प.चे मा सदस्य नंदकुमार पिंगळे आदीसह समता परिषदेचे सर्व पदाधिकारी,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.ङ्ग     हा  पुरस्कार सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी पत्रकार सावता जाधव, निलेश मोहिते,शाखाध्यक्ष शंकर बनसोडे,श्याम गोडसे,चंद्रकांत काळे,ग्रा प सदस्य जयंता जाधव,दिपक प्रक्षाळे,सद्दाम मणेरी,बबलू बनसोडे,समाधान जाधव,आकाश जाधव आदीसह समता परिषदेचे सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.


    
















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments