प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या कादंबरीचे मॉरिशस येथे प्रकाशन.

पंढरपूर LIVE 28 नोव्हेंबर 2018



पंढरपूर (प्रतिनिधी) :- येथील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या “सावलीचं झाड उन्हात” या कादंबरीचे प्रकाशन मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिटय़ूट येथे संपन्न झालेल्या आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेत संपन्न झाले .
          मॉरिशस येथे संपन्न झालेल्या या परिषदेत 'स्नेहवर्धन प्रकाशन' पुणे द्वारे प्रकाशित प्राचार्य शिवाजीराव बागल याच्या कादंबरीचे प्रकाशन अमेठी इन्स्टिटय़ूट ऑफ हायर एज्युकेशनचे कुलगुरु डॉ धनंजय केसकर, महात्मा गांधी इन्स्टिटय़ूटच्या विभाग प्रमुख प्रा मधुमिता कुंजल, डॉ स्नेहल तावरे, डॉ लालसिंह तावरे, डॉ निला पांढरे, डॉ अश्विनी घोरपडे या मान्यवरांच्या उपस्थितीत  संपन्न झाले.
          प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या कादंबरीचे मॉरिशस येथील मोका येथे प्रकाशन संपन्न झाल्यामुळे येथील विश्वविक्रमी कवी रवी वसंत सोनार, राजेंद्र झुंबर भोसले, दादासाहेब खरात, सुजीतकुमार कांबळे, सचिन कुलकर्णी, राधेश बादले -पाटील तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील साहित्यिक, साहित्य रसिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांकडून प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



    












महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments