खर्डीत श्री सीताराम महाराज नामसप्ताह उत्सवाला झाली सुरवात

पंढरपूर LIVE 30 नोव्हेंबर 2018



खर्डी प्रतिनिधी संतोष कांबळे 

सोलापूर जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी येथील श्री सीताराम महाराजांचा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हरिनाम सप्ताह चे आयोजन केले असल्याची माहिती समाधी मंदिर ट्रस्ट यांचे वतीने देण्यात आली.दिनांक 29 रोजी हरिनाम सप्ताह सुरू झाला. मानाप्रमाणे सप्ताहाचे सात दिवस केसकर (कुलकर्णी) घराण्याकडे प्रत्येकी एक दिवस पूजा नैवेद्य आरतीचा मान असतो.दिवसभर प्रवचन, कीर्तन ,रात्रभर जागर ,पारायण केले जाते.आठवडाभर मंदिर ट्रस्ट ,ग्रामस्थ तसेच भाविक यांचेकडून रोज मिष्टान्न भोजन वाटपाच्या पंगती चे आयोजन केले आहे. श्री सिताराम महाराज मंदिर आला आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे मंदिर अजूनच उठून दिसत आहे
यावेळी मुख्य विश्वस्त हरीभाऊ कुलकर्णी,सचिव गंगाधर केसकर,विकास कुलकर्णी, युटोपीयन साखर कारखान्याचे चेअरमन उमेशराव परिचारक आदी उपस्थित होते.
भंडारा हा मुख्य उत्सव 

दिनांक 5 डिसेंबर रोजी कार्तिक वद्य त्रयोदशीला पुण्यतिथी उत्सव म्हणजे भंडारा साजरा केला जातो. श्रींच्या समाधीवर दुपारी 12 वा पुष्पवर्षाव केला जातो.आरती व महाप्रसाद वाटप केले जाते.त्यानंतर पालखीचे मिरवणूक होते.राज्याबरोबरच कर्नाटक ,गुजरात,आंध्र प्रदेश आदी भागातून भाविक हजेरी लावतात.
या यात्रा कालावधी साठी ग्रामपंचायत खर्डी च्या वतीने सर्व तयारी करण्यात आली आहे यामध्ये  स्वछता ,पाणीपुरवठा,लाईट,पार्किंग सज्ज असल्याची माहिती सरपंच रमेश हाके यांनी दिली यात्रा कालावधीत वाहन गावात येऊ न देता बाहेरून जाण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.याकरिता उपसरपंच प्रणव परिचारक व सर्व सदस्यांबरोबर ग्रामसेवक मकर ,बंडूलाल पठाण , प्रभु गायकवाड पोपट कावरे, तसेच गावातील युवक कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत 


    














महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments