समस्त महादेव कोळी समाज संघाच्या जिल्हा संघटकपदी किरण साळुंखे तर जिल्हा उपाध्यक्षपदी नाना झुंजार यांची निवड विविध पदाधिकार्‍यांच्याही निवडी जाहीर

पंढरपूर LIVE 22 नोव्हेंबर 2018


समस्त महादेव कोळी समाज संघाच्या जिल्हासंघटकपदी किरण साळुंखे यांची,जिल्हा उपाध्यक्षपदी नाना झुंजार यांची तर विद्यार्थी संघाच्या शहराध्यक्षपदी अशिष कोळी यांची निवड करण्यात आली आहे.येथील संत गाडगेबाबा मठात आयोजीत समस्त महादेव कोळी समाज संघाच्या बैठकीत संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप माने यांच्या हस्ते या निवडींचे पत्र प्रदान करण्यात आले.नुतन जिल्हा उपाध्यक्ष झुंजार कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त गोापाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रमात मिष्टान्न भोजन प्रदान करण्यात आले.  
     


   या वेळी बोलताना समस्त महादेव कोळी समाज संघाचे संस्थापक संदीप माने म्हणाले की, राजकीय जोडे बाहेर ठेवून आपण समाजाच्या हितासाठी समाजाच्या विविध प्रश्‍नासाठी एकत्र आलो आहोत.आपल्या हातून आपल्या समाजाची सेवा घडावी या हेतूने समस्त महादेव कोळी समाज संघाची वाटचाल सुरु आहे.नुतन पदाधिकार्‍यांनी संघाच्या माध्यमातून समाजास संघटीत करण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत.   
   यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल अधटाराव,युवक जिल्हाध्यक्ष बबलू बोराळकर,शहराध्यक्ष संतोष अभंगराव,बाबा ग्रूपचे संस्थापक उत्तम चव्हाण,विनायक अधटराव,चौरंगनाथ झूंजार,विकास नकाते,नवनाथ चव्हाण,पांडू होनकुमरे,संतोष माने,पप्पू कोळी,सागर पवार,अजय क्षिरसागर,बंडू नकाते,भाऊ होनकुमरे,धनाजी नकाते,बिरु शेजाळ,पांडू माने,मोनू बोंबाळे,सुरज पवार,गणेश बोंबाळे,उमेश करे,उमेश साळुंखे,राजू माने,ॠषी कोळी,राम मळगे,अदित्य माने,बंडू सुतार,विजय चव्हाण,सुरज कांबळे आदी उपस्थित होते.











महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments