शालेय खो खो स्पर्धेत वसंतराव काळे प्रशाला राज्यात प्रथम.. तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पंढरपूर LIVE 21 नोव्हेंबर 2018

 
पंढरपूर  (प्रतिनिधी) दि.२२-  वाशीम येथे  दि १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या १४ वर्षाखाली मुलींच्या गटात वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ट महाविद्यालय वाडीकुरोली संघाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या संघातील तीन खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवरील १४ वर्षाखालील शालेय खो खो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या विजयामुळे  वसंतराव काळे प्रशालेचा  संघ पंढरपूर तालुक्यात राज्यस्तरीय स्पर्धेत अजिंक्य पद मिळविणारा पहिला संघ ठरला आहे. 

  

क्रीडा व युवक सेवा संकलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद वाशीम यांच्या वतीने पार पडलेल्या सामन्यात  उप उपांत्य सामन्यात वसंतराव काळे प्रशालेच्या खेळाडूंनी मुबई विभागाचा १ डाव १४ गुणांनी  पराभव केला. उपांत्य सामन्यात कोल्हापूर विभागाचा ५ मिनिटे वेळ राखून पराभव केला. अंतिम सामन्यात लातूर विभागाचा १ डाव ३ गुणांनी पराभव करून राज्य अजिंक्य पद मिळविले. या सर्व सामन्यात कर्णधार पूजा सावंत, प्रीती काळे, अमृता माने, समृद्धी सावंत, अमृता माने, साक्षी काळे, रोहिणी काळे, भाग्यश्री काळे, संध्या सुरवसे, शिवानी येड्रावकर, प्रणाली काळे, सानिका मुंगूसकर, वैष्णवी काळे, या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करून संघाला नेत्रदीपक यश मिळवून दिले. 
    


 ग्रामीण भागात खेळाच्या अत्याधुनिक सुविधा नसतानाहि या मुलींनी शहरातील नावाजलेल्या संघाना धूळ चारत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या १४ वर्षाखालील शालेय खो खो संघात  या प्रशालेतील तीन खेळाडूंची निवड झाल्याने त्यांच्याकडून राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. 
या सर्व  यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा.संतोष पाटील सर, प्रशिक्षक  प्रा.एस.एस.काळे, अतुल जाधव, मनीषा कस्तुरे, यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शकांचे संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सचिव बाळासाहेब काळे, प्रा. हणमंत जमदाडे, सर्व संचालक मंडळ, वसंतराव काळे शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. 



तिघींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड 
वसंतराव काळे प्रशालेतील १४ वर्षाखालील मुलींच्या गटातील  कु. पूजा भिकाजी सावंत, प्रीती अशोक काळे, अमृता रघुनाथ माने, या खेळाडूंची बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. 


 विजयी खेळाडूंची मिरवणूक 
राज्य पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धेत पंढरपूर तालुक्यातून पाहिलांदाच अजिंक्यपद मिळविलेल्या वसंतराव काळे प्रशालेच्या सर्व खेळाडूंची भंडीशेगाव, शेळवे, वाडीकुरोली, पिराचीकुरोली, खळवे, दसूर,  आदी ठिकाणी ढोल ताश्या व फटाक्याच्या आतिषबाजीत जल्लोष करून मिरवणूक काढली.यावेळी अनेक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. 







महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments