शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोनके येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

पंढरपूर LIVE 24 नोव्हेंबर 2018


26 नोव्हेंबर शहीद दिनानिमित्त व माजी सैनिक स्व.बापू दुधाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोनके ता.पंढरपूर येथे कै.जगन्नाथ बापू दुधाळ बहुद्देशीय संस्था व पंढरपूर ऍथलॅटिक्स असोशियनच्या वतीने भव्य खुल्या पुरुष 5 कि.मी.मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उदघाटन   वर्ल्ड कन्स्टीटयुशन व पार्लमेंटरी असोशियनचे मेंबर व पारंपारीक ढोल वादक डॉ.बाळासाहेब मंगसुळे यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नामदेव थोरबोले,प्रा.सुभाष मस्के,धुळदेव कोळेकर,शिवाजी हळणवर,कॅ.डि.डि.आखाडे,बाळासाहेब किसवे,राजाभाऊ लांडे आदी उपस्थित राहणार आहेत.
    या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक 8 वाजता सोनके ता.पंढरपूर येथे उपस्थित रहावे. या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकास प्रथम बक्षीस 5 हजार रोख व प्रशस्ती पत्र,द्वितीय बक्षीस 3 हजार व प्रशस्तीपत्र,तृतीय बक्षीस 2 हजार व प्रशस्तीपत्र,चतुर्थ बक्षीस 1 हजार व प्रशस्तीपत्र,उत्तेजनार्थ बक्षीस 1 हजार रुपये प्रदान करण्यात येणार आहे.तरी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


    















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments