येत्या ९ डिसेंबरला पुण्यात भरणार स्वेरीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा !

पंढरपूर LIVE 5 डिसेंबर 2018


स्वेरीच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना मेळाव्यात सहभागी होण्याची संधी .
पंढरपूरः- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने रविवार दिनांक ०९ डिसेंबर २०१८ रोजी विठ्ठल अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्याकरिता असलेल्या ऋणानुबंध २०१८’ या मेळाव्याचे यंदा ‘पुण्याई सभागृह, पौड रोड, कोथरुड, पुणे’ या ठिकाणी आयोजन केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
       


    ऋणानुबंध २०१८ या माजी विद्यार्थी मेळाव्यात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हे मनमुराद चर्चा, आपआपसात सुसंवाद, नव्या विचारांबरोबरच जुन्या आठवणींच्या शिदोरीची देवाण घेवाण करणार असून आपण काम करत असलेल्या कंपनीत अथवा नोकरीत येत असलेले अनुभव कथन व असे अनेक भरगच्च कार्यक्रम या मेळाव्यात असणार आहेत. महाविद्यालयातर्फे माजी विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. ऋणानुबंध २०१८’ या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ‘अल्फा लवाल इंडिया प्रा. लिमिटेड’चे व्हाईस प्रेसिडेंट-एच.आर. विनोद बिडवईक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ बी.पी.रोंगे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अधिष्ठाता व माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.माधव राऊळ, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश कांबळे यांचेसह इतर पदाधिकारी हे माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. एकूणच सदर मेळावा जुन्या आठवणींना उजाळा देण्यात, गतकाळात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकीच्या स्थापनेपासून म्हणजे १९९८ पासून ते गतवर्षीपर्यंत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. स्वेरीमध्ये अभियात्रिंकीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने विद्यार्थी पुणे, मुंबई, बेंगलोर तसेच भारतातील अन्य प्रमुख शहरांमध्ये व परदेशात स्थाईक झालेले माजी विद्यार्थीदेखील मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 

एकूणच ऋणानुबंध २०१८ च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुना चिवचिवाट पुण्यातील कोथरुड परिसरात नव्याने घुमणार आहे. अधिकाधिक विद्यार्थी हे पुण्यात स्थायिक झाले असून अनेकांना कंपनीतील व्यापामुळे पंढरपुरात येणे श्यक्य होणार नही परंतु या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी मेळाव्यात सहभागी होता यावे म्हणूनच पुण्याच्या कोथरुड भागात याचे नियोजन केल्याचे डॉ. राऊळ यांनी सांगितले. माजी विद्यार्थी मेळाव्यासंबंधीच्या अधिक माहीतीसाठी डॉ.माधव राऊळ (मोबा. क्र. ९५४५५५३८८१) यांच्याशी संपर्क साधावे.असे आवाहन देखील करण्यात आले.









महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments