पंढरपूर LIVE 3 डिसेंबर 2018
अपंग बंधु-भगिणींसाठी समाधानदादा आवताडे युवामंचने आपले हात पुढे केले असून लवकरच पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अपंग बंधु-भगिणींना कृत्रीम हात व पायांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
श्री. संत दामाजी सह. साखर कारखान्याचे चेअरमन समाधान (दादा) आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या भागातील हात-पाय नसलेल्या अपंग लोकांना मोफत कृत्रिम हात-पाय मिळवून देण्यासाठी समाधान (दादा) आवताडे युवामंच पंढरपूर, मंगळवेढा व साधू वासवानी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत श्री. संत तनपुरे महाराज मठ,स्टेशन रोड, पंढरपूर, जिल्हा सोलापूर या ठिकाणी मोफत कृत्रिम हात-पाय वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये हाता-पायाने अपंग असलेल्या लोकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे.तसेच अपघातामुळे, मधुमेहमुळे, रक्तवाहिन्यांचे आजारामुळे, गँगरीन व इतर कारणामुळे हात-पाय काढलेल्या रुग्णांना नवे जीवन मिळण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. हे कृत्रिम अवयव वापरण्यास अत्यंत सोपे असूनअगदी पूर्वीप्रमाणे चालण्यास तसेच त्यांना सर्व कामे करण्यास सोयीचे होणार आहे. सामान्य लोक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या खेळाच्या, नृत्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले कौशल्य दाखवतात त्याचप्रमाणे अगदी सायकल,रिक्षा, अथलेटिक्स खेळ व नृत्यासह अपंग रुग्णांना या अवयवाचे साह्याने वेगवेगळ्या खेळाच्या, नृत्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल व त्यांच्याही जीवनामध्ये त्यांना आनंद मिळवता येईल.
नाव नोंदणीसाठी समाधान (दादा) आवताडे जनसंपर्क कार्यालय शिवबा काशीद चौक, ब्लड बँक,अश्विनी गॅस एजन्सी जवळ, भक्तिमार्ग, पंढरपूर व मा. श्री. समाधान (दादा) आवताडे जनसंपर्क कार्यालय, सरकार चौक, मंगळवेढा, जि. सोलापूर येथे ज्यांना हात-पाय नाही किंवा ऑपरेशन करून ज्यांचा हात-पाय काढून टाकलेला आहे अशा रुग्णांनी आपली नावे दिनांक 4 डिसेंबर ते 8 डिसेंबर पर्यंत सकाळी 11:00 ते 5:00 या कार्यालयात नोंदवावे संपर्कासाठी मोबाईल नंबर्स 9850253601, 9850133899, 8421833005, 9404040447, 7020673840,9881625677, 9922250838, 9421045716, 9503087733 या सुवर्ण संधीचा आपल्या भागातील हात-पाय नसलेल्या अपंग रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन समाधान (दादा) आवताडे युवामंच पंढरपूर मंगळवेढा यांच्यावतीने समाजसेवक संतोष कवडे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments