खर्डी येथे अमावस्या निमित्त हजारो भाविकांनी घेतले श्री सीताराम महाराजांचे दर्शन

पंढरपूर LIVE 7 डिसेंबर 2018





खर्डी प्रतिनिधी संतोष कांबळे
आज अमावस्येनिमित्त खर्डी (ता.पंढरपूर) येथील सिताराम समाधीचे दर्शन अनेक भाविकांनी घेतले.  27 तारखेपासून सुरू असलेल्या श्री सीताराम महाराजांच्या नामसप्ताह सोहळ्याची सांगता सहा डिसेंबरला झाली.   लगेच अमावस्या असल्या मुळे  प्रत्येक महिन्याला येणारे भाविक भक्त श्री सीताराम महाराजांच्या दर्शनासाठी खर्डी येथे दाखल झाले.

 ग्रामपंचायतीने व ट्रस्टच्या वतीने  श्री सिताराम  महाराज महाप्रसादालयात महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.  सात ते आठ हजार भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. खर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश हाके, उपसरपंच प्रणव परिचारक, ग्रामपंचायत सदस्य शहाजी कांबळे, सिताराम रोंगे, बंडू रणदिवे, तंटामुक्त अध्यक्ष रवींद्र रोंगे, उमा रोंगे, माजी सरपंच भगवान आप्पा रोंगे, पुजारी बापू केसकर, लक्ष्मण तात्या रोंगे यांच्या शुभहस्ते भाविकांना मिष्टान्न भोजन वाढण्यात आले.  महाराजांच्या नामसप्ताह उत्सवानिमित्त परीते गावचे भक्त विष्णू सिद्राम वंजाळे यांनी गेले सात दिवस खर्डी गावातील सर्व मंदिर परिसर स्वच्छ करून आपली सेवा श्रींच्या चरणी अर्पण केली.  ही यात्रा शांततेत व भक्तीमय वातावरणात पार पडल्याची माहिती पंढरपूर लाईव्हशी बोलताना श्री सीताराम महाराजांचे पुजारी बापू केसकर व हनुमंत केसकर यांनी दिली.


    












महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments