कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय सर्वच बाबतीत उत्कृष्ट - प्रा. डॉ. हिरामण तिवारी

पंढरपूर LIVE 12 डिसेंबर 2018


पंढरपूर: ‘कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय कॉलेज वीथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स (यू. जी. सी. - सी. पी. ई.)  तर आहेच, त्याच्याही पलीकडे जाऊन पाहिले तर हे महाविद्यालय सर्वच  बाबतीत उत्कृष्ट आहे’ असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली मधील इतिहास अभ्यास केद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. हिरामण तिवारी यांनी व्यक्त केले.  त्यांच्या समवेत आलेल्या श्री. दुर्गा मल्लेश्वरा महिला महाविद्यालय, विजयवाडाच्या प्राचार्य डॉ. सौ. टी. विजया लक्ष्मी म्हणल्या की, ‘अध्ययन, अध्यापन, संशोधन, गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि अभ्यासक्रमा शिवाय कॉलेज वीथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स अंतर्गत घेतले जाणारे विविध कोर्स आणि उपक्रम या बाबतीत या महाविद्यालयाचे काम उत्कृष्ठ आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांचे नेतृत्व आणि सेवकांचे योगदान यामुळे येणार्‍या काळात महाविद्यालय अजून प्रगती करेल.’ या समितीने महाविद्यालयातील सर्व विभागांना भेट देऊन पाहणी केली. यू. जी. सी.- सी. पी. ई.अंतर्गत मिळालेल्या अनुदानातून अद्ययावत झालेल्या प्रयोगशाळांमुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि संशोधक यांना आवश्यक आधुनिक  उपकरणे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेत आणि  संशोधनामध्ये वाढ होणार आहे.     

        


पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाला शनिवार दि. ०८ डिसेंबर २०१८  रोजी  यू. जी. सी.- सी. पी. ई. सल्लागार समितीने भेट दिली. प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. समाधान माने यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांचे सादरीकरण समिती समोर केले.  डॉ. अमर कांबळे, डॉ. एम. एम. जडल यांनी मोलाचे योगदान दिले. उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, डॉ. एस. एस. माने, प्रा. एन. एन. तंटक, कार्यालयीन प्रमुख श्री. शिवाजी लोभे, श्री. एस. डी. जाधव, शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक आणि विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. 





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments