स्व.वत्सला गोपाळ बडवे यांच्या स्मरणार्थ पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटूंबाना 1 लाखाची मदत

Pandharpur LIVE 15 March 2019


  शहीद सैनिकांच्या कुटूंबाची पंढरीतील मातोश्री कृपा भक्त निवासात मोफत निवासाची सोय 
स्व.सौ.वत्सला गोपाळ बडवे

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या  जनवानांच्या कुटूंबीयांना पंढरीतील स्व.सौ.वत्सला गोपाळ बडवे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र मंदार गोपाळ बडवे व बडवे कटुंबाच्या वतीने 1 लाख रुपयांच्या अर्थिक मदतीचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे धनादेश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
 मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात हा धनादेश देताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,सहकार मंत्री सुभाष देशमुख,भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर,पंढरातील लेखापरिक्षक संकेत पवार आदी उपस्थित होते.
  या बाबत बोलताना मंदार बडवे म्हणाले की,देशसेवेसाठी प्राणाची आहूती देणार्‍या शहीद जवनांच्या कुटुंबाचा  त्याग  फार मोठा आहे.त्याची तुलना होऊ शकत.देशसेवेसाठी शहीद झालेल्या जनवांचे कुटूंबीय पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी आल्यानंतर त्यांचा यथोचीत सन्मान करुन मातोश्री कृपा भक्त निवासात त्यांची मोफत निवासाची सोय करणार असल्याचे यावेळी मंदार बडवे यांनी सांगीतले.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 



Post a Comment

0 Comments