यावेळी अ.भा.माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे, ह.भ.प. अरुणभाऊ बुरघाटे महाराज, राजकीय विश्लेषक प्रा. धैर्यशील भंडारे, पत्रकार श्रीकांत कसबे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सेवागिरी गोसावी, बी. आर. भोसले, भारिपचे पंढरपूर तालुकाध्यक्ष ऍड. सुरेश कांबळे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष महादेव ढोणे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष जुबेर बागवान, भारिपचे शहराध्यक्ष प्रकाश दुपारगुडे, आपचे सचिव नागेश पवार, बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणकर, बारा बलुतेदार संघटनेचे भाई किशोर भोसले, युवा जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड, शहाजी लोखंडे, विनोद कांबळे, नाथा कांबळे, अक्षय जगताप उपस्थित होते.
सदर नियोजनाच्या बैठकीस वंचित बहुजन समाजातील व अल्पसंख्यांक समाजातील युवकांची मोठी उपस्थिती होती. सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र रणदिवे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष योगेश मोरे यांनी मानले.
0 Comments