मंगळवेढा-सांगोला तालुक्यात गारांचा पाऊस..वीज पडून जनावरे ठार

Pandharpur LIVE 31  March 2019




रविवारी पहाटे झालेल्या वादळी पाऊस व गारांनी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील गावांना झोडपून काढले. यावेळी पडलेल्या वीज अंगावर पडून म्हैस आणि बैलाचा मृत्यू झाला
रविवारी पहाटे दोन ते चार या वेळेत सांगोला तालुक्यातील खवासपूर, लोटेवाडी परिसरात बोरांच्या आकाराच्या गारांसह अवकाळी पाऊस झाला. यावेळी अंगावर वीज पडून एक म्हैस मृत्यूमुखी पडली.
याच सुमारास मंगळवेढा तालुक्यातील माळेवाडी येथे अंगावर वीज पडून एक बैल ठार झाला.
या अवकाळी गारांच्या पावसामुळे द्राक्ष, डाळींब आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

खालील लिंकला क्लीक करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा Pandharpur Live  चे अन्ड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन.  https://play.google.com/store/apps/details 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 

कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर

Mail- livepandharpur@gmail.com 


Post a Comment

0 Comments