रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरला पाठीमागून येणा-या कारची जोरदार धडक बसली. यामध्ये २० दिवसांच्या बाळासह एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ, त्यांची आईचा समावेश आहे. किशोर हाके (वय ३२ वर्ष), शुभम हाके (वय २५ वर्ष) विमल माधव अशी मृतांची नावे आहेत. पुणे-अहमदनगर महामार्गावर पहाटे तीनला भीषण अपघात झाला.


या विषयी अधिक माहिती अशी की, किशोर हाके यांना २० दिवसांपूर्वीच मुलगा झाला होता. पत्नी आणि मुलाला आपल्या घरी आणण्यासाठी ते औरंगाबादेत भाऊ आणि आईसह गेले होते. प्रवासादरम्यान काळाने त्यांच्यावर घाला घातला.
किशोर हाके औरंगाबादहून रात्री कारने पत्नी व लहान बाळाला घेऊन पुन्हा वाघोलीच्या दिशेने निघाल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास त्यांची कार शिरूर बायपास पाचर्णेमळा येथील पुलाजवळ पोहोचली. यावेळेस पुलावर रस्त्याच्या कडेला बंद असलेल्या कंटेनरला पाठीमागून येणा-या कारची जोरदार धडक बसली. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.


0 Comments