पंढरीतील स्टेट बँकेतून 9 लाखांची चोरी.. चोरटे सीसीटीव्हीत कैद




पंढरपूर:-  भारतीय स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेत भरणा करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाची 9 लाखांची रोकड चोरट्यांनी हातोहात लंपास केली. सीएमएस या कंपनीचा तरुण 9 लाखाची रक्कम घेऊन स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेतील कैश कॉटरवर उभा होता, त्यावेळी तीन ते चार तरुणांनी रोकड घेऊन उभा असलेल्या सौरभ सतीश हेंद्रे या तरुणाला घेरले आणि त्याचे लक्ष विचलित केले. त्याचवेळी समोर उभा असलेल्या गार्डचे लक्ष वेधण्यासाठी एकजण दुसर्‍या बाजूने उभा राहिला, त्याने गार्डचे लक्ष दुसरीकडे वेधले आणि चोरट्यानी टेबलावर ठेवलेली बॅग पळविली. चारही चोरटे बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  उपसंपादक - विजयकुमार गायकवाड Whats Up -  8308838111, 7083980165 Mobile- 7972287368Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments