पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमात यावर्षीची बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट पुरस्काराची मानकरी कु. प्रतीक्षा संजय चिंचकर हि ठरली आहे.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, विभाग प्रमुख डॉ.चेतन पिसे, प्रा. यशवंत पवार, प्रा. श्रीगणेश कदम, प्रा. चंद्रकांत देशमुख ,प्रा. संगमनाथ उप्पीन आदी मान्यवरांच्या हस्ते करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचा आदर व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला.
यावर्षीचा बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट पुरस्कार देण्यात आलेल्या कु. प्रतीक्षा संजय चिंचकर हिचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते सत्कार करून सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गुलाब देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वृषभ जैन यांनी केले.

0 Comments