कासेगाव:- सातवा मैल कासेगाव, तालुका पंढरपूर येथे डॉ. बी. आर पाटील यांच्या मातोश्री फार्महाऊसवर मातोश्री चॅरीटेबल फाउंडेशन च्या वतीने हनुमान जयंती दिनी रक्तदान शिबीर आणि काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष पत्रकार भगवान वानखेडे हे उपस्थित होते. अध्यक्षांनी व प्रमुख पाहुण्यांनी मातोश्री फाउंडेशनच्या फलकाचे अनावरण केले. तसेच मातोश्री चॅरीटेबल फाउंडेशनच्या स्थापनेमागचा उद्देश फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा डॉ. संगीता पाटील यांनी स्पष्ट केले. डॉ. बी. आर. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कठीण प्रसंगाचे वर्णन करत डॉक्टरही माणुस असतो, त्यालाही भावना असतात असे सांगुन वैद्यकीय क्षेत्रात काम करताना डॉक्टरांना येणार्या अडचणी व वेदनांचे दर्शन घडवून दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोलसे यांनी रक्तदानाचे महत्व सांगुन येथील रक्तदान शिबीरामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे भगवान वानखेडे यांनी मातोश्री चॅरिटेबल फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करत समाजात इतरांना कांहीतरी देण्यासाठी कार्यरत असणार्या अशा संस्थांची गरज असल्याचे सांगितले.
































0 Comments