भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सोहळ्यानिमित्त 19 व 20 एप्रिल रोजी मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचे स्वागत करण्याबरोबरच या मंडळांना पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवून देण्याच्या हेतूने विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतीने पोलीस उपअधिक्षक डॉ.सागर कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहर पोलीस निरिक्षक राजेश गवळी यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डि.राज सर्वगोड,विलास जगधने सर,मिराबाई सरवदे,रामदास सर्वगोड,राजश्री सर्वगोड,सुमन जाधव,लक्ष्मी सर्वगोड आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबडेकर प्रतिष्ठाणचे संस्थापक नगरसेवक डि.राज सर्वगोड म्हणाले की,डॉ.बाबासाहेब अंाबेडकर जयंती निमित्ताने एकुण 8 मंडळांनी भव्यदिव्य मिरवणूकीचे आयोजन केले होते.या मिरवणूकीत सहभागी झालेल्यांना प्रतिष्ठाणच्या वतीने पाणी बाटली,बिस्कीट वाटप करण्यात आले तर मिरवणूकीत सहभागी झालेल्या मंडळाच्या पदाधिकार्यांना मानाचा फेटा,पंचशील आणि सन्मानपत्र व तसेच रोप भेट देवून सत्कार करण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आदम बागवान,रमेश सासवडकर,पदमाकर सर्वगोड,संतोष बंडगर,आण्णा सलगर,अजिंक्य देवमारे,पद्माकर सर्वगोड,निेलेश जाधव,सचिन जाधव,सुरेश नवले,प्रा.सुदर्शन मसुरे ,सचिन बडकवार,सारिका जाधव,आकाश फडतरे,ऍड.प्रशांत सर्वगोड,आदम मुजावर,सोहन जैस्वाल,लखन मानेयांच्यासह प्रतिष्ठाणच्या विविध पदाधिकर्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


0 Comments