लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत सरासरी ५० टक्केहून अधिक मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील सहाही मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्केहून अधिक मतदान झाले आहे. मतदान संपेपर्यंत मुंबईतील सहाही मतदारसंघातील मतदान ५५ टक्केच्या पुढे झालेले असेल असे मतदानाला लागलेल्या रांगावरून म्हणता येईल. दुसरीकडे, कल्याणमध्ये मतदारांत निरूत्साह दिसून आला. ठाणेकरांनीही मुंबईकरांच्या तुलनेत अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याचे आकडेवारीवरून दिसते.

कल्याणमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत केवळ ४१. ६४ टक्के मतदान झाले होते तर ठाण्यात ४६.४२ टक्के मतदान झाले होते.
उर्मिला मातोंडकर लढवत असलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५ टक्के मतदान झाले आहे.
मावळ व शिरूरमध्ये ५३ टक्के तर व शिर्डीत ५६ मतदान झाले आहे.




0 Comments