पंढरपूर,प्रतिनिधी
शासन सर्वसामान्य शेतकर्यांना उभारी देण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे.मात्र दुसरीकडे शासनाच्याच काही योजना व कामे शेतकर्यांच्याच अंगलट येत असल्याचे पहावयास मिळत आहे.उपरी(ता.पंढरपूर)येथे पंढरपूर-सातारा रस्त्याचे काम अपुर्ण असल्यामुळे उडणार्या धुळीने एक अख्खा मिरचीजा प्लॉटच संपवला आहे.त्यामुळे शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाकडून अपुर्ण कामाकडे जाणीवपुर्वक दुलर्क्ष केले जात आहे.
देवभुमी पंढरीला जोडणार्या सर्व रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रीटीकरणाचे काम सध्या सुरु आहे.यामध्ये पंढरपूर ते म्हसवड या रस्त्याचा समावेश असून रोडवेज सोल्यूशन या कंपनीकडे हे काम आहे.सुरुवातीला वेगाणे काम करुन संबधित कंपनीने इतरही अनेक रस्त्यांची कामे आपल्या पदरात पाडून घेतली आहेत.त्यामुळे नवीन कामाकडे पळायचे आणी जूने काम अपुणे पाडून वाहनधारकांना वेठिस धरायचे असा प्रकार कंपनीकडून केला जात आहे.पंढरपूर-सातारा रस्त्यावर वाखरी पासून पुढे भाळवणी पर्यत अनेक ठिकाणी कामे अपुर्ण आहेत.त्यामुळे मोठ्या धुळीचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.ज्या ज्या ठिकाणी कामे अपुरे आहेत तेथे पाणी मारल्याचा केवळ दिखावा केला जात आहे.त्यामुळे ्रअपुर्ण कामांच्या आसपासचे शेतकरी परेशान झाले आहेत.उपरी येथील केवडेच्या ओढ्याजवळ छोट्या पुलाचे काम अनेक दिवसांपासून अपुरे आहे.पुर्वीच्या एका ठेकेदाराचे साहीत्य चोरीला गेल्यामुळे दुसर्या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे.परंतु जो पर्यत माझे बिल अदा केले जात नाही तोपर्यत मि काम सुरु होवू देत नाही असा पवित्रा पहील्या ठेकेदाराने घेतला असल्यामुळेच काम अपुर्या अवस्थेत पडले असल्याचे कंपनीच्या अधिकार्यांकडून सांगितले जात आहे.परंतु या ठिकाणी वळण व उतार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडते.यामुळे या रस्त्याच्या शेजारील शेतकरी श्रीमंत हरीदास नागणे यांचे 15 गुंंठे मिरचीचा प्लॉटचे नुकसान झालेे आहे.
याच प्लॉट मधूुन मागीव वर्षी केवळ 2 महीन्यात एक लाखाचे उत्पन्न मिळाले होते.अपुर्ण रस्त्याच्या कामामुळे उडणारी धुळ झाडांच्या पानावर जावून अक्षरश: थर करुन बसते.पाणी मारून धुळ घालवण्याचा प्रयत्न ही अनेकदा फसला आहे.धुळीच्या मातीमुळे पाणांची शोषण क्षमता कमी झाली असून फुल गळीमुळे कळीही अ्रत्यंत कमी प्रमाणात आली आहे.त्यामुळे माल कमी आला आहे.मागील वर्षी आठवड्ययाला दोनशे ते तिनशे किलो माल निघत होता.परंतु सध्या केवळ 40 ते 50 किलो माल निघत आहे.बाजारात मिरचीला 40 ते 50 किलो दर मिळत आहे परंतु जेमतेम निघालेल्या धुळयुक्त मिरचीला कोणीही विकत घेत नाही त्यामुळे कवडीमोल दराने माल विकावा लागत आहे.मागील वर्षी चांगले मिळालेल्या उत्पन्नामुळे यंदा मोठा खर्च करुन मिरचीची लागवड केली होती परंतु धुळीमुळे ऐन दुष्काळात मोठे आर्थीक नुकसान झाले आहे.त्यामुळे जाणीवपुर्वक रस्त्याचे काम अपुर्ण ठेवून शेतकर्यांसह वाहनधारकांना वेठिस धरणार्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी श्रीमंत नागणे यांनी केली आहे.
अपुर्ण कामांच्या ठिकाणी पाणी मारले जात नसल्यामुळे मोठी धुळ उडते यामुळे आसपासच्या शेतकर्यांमध्ये श्वसनाचे आजार वाढत आहेत.एखादे मोठे वाहन आल्यास दुचाकी स्वारांना मोंठी तारेवरीचा कसरत करावी लागत असते.त्यामुळे त्वरीत अपुर्ण कामे पुर्ण करावीत अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल-----विलास जगदाळे,संचालक सहकार शिरोमणी.





0 Comments