पंढरपुर नगरपरिषद चे माजी पक्षनेते व माजी नगरसेवक सचिन डांगे यांचे आज सकाळी 11:30 वाजता
हृदयविकाराने दुःखद निधन झाले.
काल रात्री त्यांंना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.
सचिन डांगे हे राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान देणारे समाजसेवक म्हणुन सुपरिचित होते. आपल्या मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभावामुळे त्यांनी खुप मोठा मित्रपरिवार मिळवला होता. अनेकांच्या मदतीला धावून जाणा-या पंढरीतील या सुपूत्राच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी नगरसेविका सुप्रिया डांगे, मुलगा, मुलगी, आई-वडील व बंधु असा परिवार आहे.
आज दुपारी 5 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घरापासून निघेल.
ईश्वर आत्म्यास शांती देवो.. पंढरपूर लाईव्ह कडून त्यांच्या चिरंतन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.





0 Comments