पंढरपूरः-‘बझी ब्रेन्स’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थीनींची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
सॉफ्ट्वेअरशी संबंधीत असलेली बेंगलोर येथील ‘बझी ब्रेन्स’ या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या एच. आर. पूजा एच.एम. व त्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनीअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रियांका धोत्रे, सायली जोशी व सायली गाडेकर या तीन विद्यार्थीनींची ‘बझी ब्रेन्स’ कंपनीसाठी निवड करण्यात आली. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये दररोज नवनवीन व आंतरराष्ट्रीय कंपन्या येतात आणि कंपनीसाठी पात्र असे विद्यार्थ्यांची निवड करतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात.
याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थीनींना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ, प्रा. डी.ए. कुंभार व प्रा.एस.व्ही.दर्शने आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी. नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख, इतर अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.




0 Comments