मंगळवेढा तालुका प्रतिनिधी:- मंगळवेढा तालुक्यांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाने चारा छावणी सुरु करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अनेक गावात चारा छावण्या चालू झाल्या आहेत. मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील गोणेवाडी, नंदेश्वर ,भोसे ,लोणार ,पडोळकरवाडी, मानेवाडी रेड्डे, शिरनांदगी या भागात छावण्या सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला; मंगळवेढा तालुक्यातील 48 छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्या सुरू करण्यासाठी गेल्या वेळेस जे संस्थाचालक होते त्याच संस्थांचे संस्थाचालक यांनी छावण्या सुरु करण्यासाठी प्रयत्न करून केले आहेत. चारा छावण्यांमध्ये पेढीचे वाटप करण्यात आले आहे. याकडे आज चांगले दुर्लक्ष होत आहे. या चारा छावण्या चालू करण्याचा निर्णयामुळे राजकीय पुढार्यांचे चांगलीच फावले आहे. अशा प्रकारचे गंभीर व खळबळजनक आरोप कांही छावणीचालकांवर होत आहेत. याकडे शासनाने तातडीने लक्ष घालून संबंधीत चारा छावण्याची तपासणी करण्याची मागणीही शेतकर्यांमधून होत आहे.
यासंदर्भात पंढरपूर लाईव्हशी बोलताना मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर चे आकाश डांगे यांनी चारा छावणी चालकांवर खळबळजनक आरोप करत छावण्यांमधील गैरकारभारासंदर्भातील अनेक महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला आहे.
0 Comments