वर्षश्राध्दाच्या पारंपारिक प्रक्रियेला छेद देत नेवासा, जि.अहमदनगर येथील कुटे कुटूंबियांनी साखर कामगार व प्रयोगशील शेतकरी कै. मनोहरराव कुटे पाटील यांना वर्षश्राध्दानिमित्त अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली अर्पण केली.
काल कै. मनोहरराव कुटे पाटील यांचे स्मृतीपित्यर्थ वृक्षारोपन केले. नैसर्गिक शेतीचे पुरस्करते श्री योगेश जामदार (कर्जत) व नेवासा येथील अमरधाम येथे स्वसंकल्पनेतून वृक्षवृल्लीने सुशोभीत करणारे अमृत फिरोदिया या दोन व्यक्तिमत्वाचां मानसन्मान मनोहराव यांचे नावे शेतीनिष्ठ शेतकरी व पर्यावरण वृक्षसंवृवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आले. अविनाश कुटे-पाटील यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






0 Comments