परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
महावितरणचे कर्मचारी नेमूण दिलेल्या ठिकाणी काम न करता उपविभागीय कार्यालयात काम करीत आहेत. ही बाब कंपनीच्या नियमाविरोधात ग्राहकांच्या सेवे देण्यास अडसर निर्माण करणारी असल्याचे दिसुन आल्याने महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी अशा विज कर्मचार्यांना शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास एक पत्र दिले असुन लातुर, निलंगा, उदगीर, उस्मानाबाद, तुळजापुर, अंबाजोगाई, बीड येथील कार्यालयासही पत्र पाठविण्यात आले आहे.
16 मे रोजी लातुरच्या महावितरण कार्यालयातील मुख्य अभियंता रामदास कांबळे यांनी हा आदेश जाहिर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काही वाहिणी कर्मचारी त्यांना नेमूण दिलेल्या ठिकाणी काम न करता उपविभागीय कार्यालयात काम करीत आहेत. ही बाब कंपनीच्या नियमाच्या विरोधात असुन ग्राहकांच्या सेवा देण्यात अडसर निर्माण करणारी आहे. या वाहिणी कर्मचार्यांनी मानव व्यवस्थापन प्रणाली मध्ये ज्या ठिकाणी त्यांचे वेतन निघते, त्याच ठिकाणी त्यांच्या सेवा घेण्यात याव्यात जेणेकरुन वाहिणी कर्मचार्यांकडुन थकबाकी, वसुली, थकबाकी ग्राहकांचा विजपुरवठा खंडित करणे, वाहिणींची देखभाल कामे व इतर शाखेतील तांत्रिक कामे यांच्याकडुन घेण्यात येतील ग्राहकांना तात्काळ सेवा देण्यास मदत होईल. वाहिणी कर्मचारी कार्यालयात काम करीत असल्याचे निर्देशनास आल्यास संबधीत कार्यालयातील अधिकारी यांच्यावरही योग्यती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. यांची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी असे ही त्यात म्हटले आहे.





0 Comments