पंढरीतील विविध विकासकामांचा शुभारंभ आज दि. 31 मे 2019 संपन्न झाला. प्रभाग क्र. 3 व 4, प्रभाग क्र. 15, प्रभाग क्र. 13, प्रभाग क्र. 12, प्रभाग क्रमांक 12 मधील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण-डांबरीकरण, काँक्रीटीकरण, पेव्हिींग ब्लॉक टाकणे आदी कामांचा शुभारंभ आज झाला.
प्रभाग क्रमांक 13 मधील सहयोग सोासायटी मधील देशमुख पेट्रोल पंप ते शासकीय वसाहत, परिचारक क्लासेस ते शिवयोगी मंगल कार्यालय रस्ता खडीकरण-डांबरीकरण करणे या कामांचा शुभारंभ सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते व पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी 7 वाजता करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्षा सौ. लतिका विठ्ठल डोके, नगरसेविका शकुंतला नडगिरे, नगरसेविका सौ. रेणुकाताई घोडके, नगरसेविका सौ.भाग्यश्री देवेंद्र शिंदे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, मुख्याधिकारी अभिजीत बापट, माजी उपनगराध्यक्ष इब्राहीम बोहरी, नंदकुमार राजुरकर, पंढरपूर नगरपरिषद पक्षनेते नगरसेवक अनिल अभंगराव सर, पक्षनेता गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक प्रशांत शिंदे, नगरसेवक सुजीत सर्वगोड, आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, अर्बन बँकेचे संचालक भाऊसाहेब जगताप, सुनिल ढोले, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेशकाका भोसले, नगरसेवक विवेक परदेशी, माजी नगरसेवक संजय अभ्यंकर, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, समाजसेवक धर्मराज घोडके, समाजसेवक नवनाथ रानगट, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, नगरअभियंता दिनेश शास्त्री, समाजसेवक चोरमले सर, समाजसेवक ओंकार बसवंती, समाजसेवक अमोल डोके, बापुसाहेब पोटे, रामदास शेटे, बाळासाहेब सावंत, दादासाहेब मोहोळकर, वसंतकाका कुलकर्णी, मंगेडकर, घोडके सर, संकेत खंडागळे यांच्यासह प्रभाक क्र.13 मधील अनेक नागरिक उपस्थित होते.
यावेळी पंढरपूर लाईव्हशी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी अधिक माहिती दिली.




0 Comments