पंढरपूर, दि. 12 :- महाराष्ट्राचा ठेवा असणाऱ्या पंढरपूरची आषाढी वारी जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील तीनही पालखी तळांची स्वच्छता व आवश्यक सोयी सुविधा वेळेपूर्वी ग्रामपंचायतींनी पुर्ण कराव्यात आणि भविकांना सुखकर वारीचा आंनद द्यावा अशा सुचना प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.
आषाढी यात्रेसंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भंडीशेगांव, पिराची कुरोली आणि वाखरी येथील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि संबधीत अधिकारी उपसस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी ढोले बोलताना म्हणाले, पालखी सोहळ्यासमवेत येणा-या भाविकांची व दिंड्यांची संख्या प्रतिवर्षी वाढत आहे. पालखी तळावर आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करणे आवश्यक असल्याने. सोहळ्यातील भाविक-भक्तांसाठी वीज, पाणी, आरोग्य, रस्ते, सुरक्षा आदी व्यवस्था वेळेत उपलब्ध करावी. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी तळावरील काटेरी झुडपे काढणे, पालखी मार्गाची डागडुजी, साईट पट्ट्याची दुरुस्ती करणे तसेच संबधित ग्रामपंचायतींनी पालखी तळांवर महिलांसाठी चेजिंग रुम उपलब्ध करुन द्यावेत.याबरोबरच वारीसाठी आवश्यक असणारी सर्व कामे वेळेपुर्वी पुर्ण करावीत. जेणेकरुन पिराची कुरोली, भंडीशेगांव तसेच वाखरी येथील पालखी तळ भाविकांसाठी सज्ज होईल.
आषाढी यात्रेसाठी शहरातील 65 एकर परिसराची स्वच्छता करणे, या ठिकाणचे स्वच्छतागृह स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे, भाविकांसाठी प्लॉटचे वाटप करुन योग्य व्यवस्था करणे तसेच महावितरणे अखंडीत वीजपुरवठा करावा त्यासाठी आवश्यक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात विशेष डिपीची व्यवस्था करावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
तसेच चंद्रभागेच्या वाळवंटात सुरु असणारे घाटबांधणीचे काम 15 जून पर्यत गुणवत्ता व दर्जेदार करुन ते भाविकांसाठी वापरण्या योग्य करुन द्यावे. पालखी मार्गावरील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरु असणारर कामे 15 जुन पर्यंत पुर्ण करावीत. अशा सुचनाही प्रांतधिकारी ढोले यांनी यावेळी दिल्या.





0 Comments