वृक्षतोडीमुळे मानवी जीवनात कमालीचा अमुलग्राह्य बदल झालेला दिसून येत आहे. झाडे लावणे ती जगविणे त्यांना वाढविणे ही सगळी कामे सरकार नावाच्या यंत्रणेने करावी, असे आमचे अनेकांचे म्हणणे आहे.आय एस आर ओ (ISRO)च्या शास्त्रज्ञांच्या पद्धतीने व मदतीने व्यवस्था करून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात एकरी ३ झाडे लावून आधारकार्ड लिंक करावे , त्याचे ऑडीट व्हावे.
भौतिक प्रगती कितीही झाली असली तरी आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.
' सुजलाम - सुफलाम ' असलेला एकेकाळचा विदर्भ आज होरपळून तापत आहे. तेव्हा येणाऱ्या सरकारमध्ये कृषीमंत्री हे शेतकरी कुटूंबातील विदर्भातीलच असावेत. शेती ही जैविक गांडूळ पध्दतीने करण्यावर आपण भर द्यावा आणि तुमच्याच काळात महाराष्ट्र रासायनिक शेतीमुक्त राज्य घोषित व्हावे, असे डॉ. विजय कापसे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.





0 Comments