राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज पंढरपूर लाईव्ह कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणार्या, समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि मागासलेल्या जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच बहुजनांमध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज पंढरपूर लाईव्ह कार्यालयात महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
सा. जोशाबा टाईम्स् चे मुख्य संपादक श्रीकांत कसबे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे, समाजसेवक ओंकार बसवंती व संतोष माने आदी उपस्थित होते.






0 Comments