पंढरपूरः- आर के इन्फोसिस्टम्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
‘आर के इन्फोसिस्टम्स’ या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे प्रमुख एच आर. उन्नाल सिंग, सौमेण दास, आम्बीर्ण भारद्वाज व त्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांमध्ये असलेली आदरयुक्त शिस्त व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगच्या तेजश्री पिटके, सुमैय्या नाशिककर व प्राजक्ता लांबतुरे तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगची गीता ताटे असे एकूण चार विद्यार्थ्यांचे ‘आर के इन्फोसिस्टम्स’ या कंपनीसाठी निवड झाली आहे.

श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये दररोज नवनवीन व आंतरराष्ट्रीय कंपन्या येतात आणि कंपनीसाठी पात्र असे विद्यार्थ्यांची निवड करतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात. याचा सखोल अभ्यास करून‘मागणी तसा पुरवठा’या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ, प्रा. डी.ए. कुंभार व प्रा.एस.व्ही.दर्शने आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख, इतर अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




0 Comments