प्रतिनिधी/पंढरपुर
कॉमेडी,अॅक्शन व रोमान्सचा भरणा असलेला पंढरपुर येथील निर्माता व दिगदर्शक सचिन धोत्रे,सतनाम फिल्मस निर्मित "परकिया" या चित्रपटाच्या टिमने विधान परिषदचे आमदार श्री.प्रशांत परिचारक यांची भेट घेतली.यावेळी दिगदर्शक सचिन धोत्रे,नायक चेतनकुमार लमाण,नायिका रूचिका शिवशरण,सोमा होरणे,ऋतुराज साळुंखे,रविराज पोतदार,राहुल पवार ,कृष्णा लाखे आदी कलाकार उपस्थित होते.सोमवार पासुन या चित्रपटाची ट्रेलर,गाणी पहायला मिळणार असल्याचे मार्केटींग प्रमुख साजिद शेख यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील तरूण चित्रपट निर्मिती मध्ये यशस्वी वाटचाल करताना पाहुन अभिमान वाटत असल्याचे आ.परिचारक यांनी सांगितले.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तरुणाईच्या उसळत्या प्रेमाचा अदभूत पूर्ण अनुभव असलेला "परकिया"हा मराठी चित्रपट येत्या १४ जुनला प्रदर्शित होणार असल्याची माहीती दिगदर्शक सचिन धोत्रे यांनी दिली.या चित्रपटाचे चित्रिकरण पंढरपुर,पुणे, उस्मानाबाद,सातारा व रत्नागिरी येथे करण्यात आले.पंढरपुर येथील सचिन धोत्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असुन दिगदर्शकाची जबाबदारी देखील त्यांनीच पार पाडली आहे.




0 Comments