पंढरपूर तालुका कोर्टी येथील एका कुटुंबावर गावातीलच काहीजणांनी काठ्या तलवारीने सामुहिक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
कोर्टी येथील सोयल रशिद शेख (२१) यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार याबाबत सविस्तर हकीकत पुढीलप्रमाणे.
दि. २७ में २०१९ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कोर्टी येथील आरोपी राजबाक्शर मुलाणी, जब्बार शेख, वाशिम मुलाणी, जैनुद्दीन शेख, उस्मान मुलाणी, गणीम मुलाणी, रहीम मुलाणी, तौफिक मुलाणी, अब्दुल मुलाणी, अस्लम मुलाणी, हारून मुलाणी यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी, चुलतभाऊ, आई, चुलती यांच्यावर काठीने, लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ व दमदाटी करत फिर्यादीचे वडिलांचे डोक्यात तलवारीने वार करून गंभीर जखमी केले.
दि. २८ में २०१९ रोजी
घटनास्थळी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आवचर यांनी भेट दिली असुन वरील सर्व आरोपींवर भादंवि कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ,५०६, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई खान हे करत आहेत.
जखमींवर उपचार सुरू आहेत.





0 Comments