दिनांक 14 मे 2019 रोजी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रेमी मित्र मंडळ,भालकी जि.बिदर,कर्नाटक तर्फे रक्त दान शिबिर संपन्न झाले.
अतिशय कमी वेळात निटनेटके नियोजन करून येथिल छत्रपती उदयनराजेंना प्रेरणास्थान माणनार्या युवकांनी एकत्रीत येत सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
तत्पूर्वी छत्रपती संभाजी चौक भालकी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून व छत्रपतींना वंदन करून रक्तदानाची सुरवात करण्यात आली.रक्त संकल्नासाठी बिदर ब्लड बँक बिदर यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच या अनोख्या सामाजिक उपक्रमासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तिय सुनिल(तात्या)काटकर (मा.सभापती शिक्षण व अर्थ विभाग सातारा जिल्हा परिषद सातारा) तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तिय व सोयरे सुनिल राजेभोसले
(श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले ह्यांचे सुपा परगना प्रमूख) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
त्याचबरोबर इर्शाद साहेबलाल मुजावर (फॅन ऑफ दैवत छ उदयनराजे भोसले)यांची या अनोख्या उपक्रमासाठी विशेष साथ लाभली.आयोजकांचे वतीने सर्व शंभू भक्त,रक्तदाते,मित्र परिवार व सर्व मार्गदर्शकांचे आभार मानण्यात आले.
0 Comments