दिनांक ११/०५/२०१९ रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परीसरात पुणे येथील भाविक श्री विनायक काची शेठ यांनी रत्नागिरी येथील ११,०००/- हापूस आंब्यांची आरास केली होती. तसेच त्यांचे कडील ६० कारागीर यांनी मंदिर परीसरात आंब्यांची सजावट केली. त्यावेळी त्यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, सदस्या ॲड. माधवी निगडे, यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड, लेखाधिकारी श्री सुरेश कदम व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.






0 Comments