पंढरपूर / प्रतिनिधी
येथील प्रतिभा क्रिएशन्सच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छुकांनी आपले लघुपट येत्या 13 मे पर्यत पाठविण्याचे आवाहन यानिमित्ताने प्रतिभा क्रिएशन्सच्या वतीने संदिप पिटके यांनी केले आहे.
प्रतिभा क्रिएशन्सच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून पंढरपूरात लघुपट अर्थात शॉर्टफ्ढिल्म महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आजपर्यत केवळ जिल्हास्तरावर सदरचा महोत्सव घेण्यात आलेला होता. मात्र यंदाच्या वर्षी राज्यस्तरीय लघुपट महोत्सव घेण्यात येणार आहे. यासाठी अनेक नवोदित कलावंत तसेच दिग्दर्शकांनी आपला लघुपट 13 मे पर्यत येथील शिवाजी चौकातील सिध्दी कॉप्युटर्स याठिकाणी पाठवून द्यायचे आहेत. महोत्सवापूर्वी नोंदणीकृत लघुपटांचाच प्रदर्शनासाठी विचार केला जाणार आहे.

विशेष म्हणजे यंदा या महोत्सवामधे सर्वोत्कृष्ट लघुपट , सर्वोत्तम दिग्दर्शक , सर्वोत्तम अभिनेता , बालकलाकार , सर्वोत्तम संगीत अशा विविध प्रकारांमधे पारितोषिके †िदली जाणार आहेत. यामधे रौप्य , आणि कांस्य पदक हे विजेत्याना बहाल करण्यात येणार आहेत. महोत्सासाठी संयोजकांकडे आलेल्या एकूण लघुपटांपैकी सर्वोत्तम शॉर्टफ्ढिल्मचे प्रदर्शन होणार आहे. सदरच्या महोत्सवाचा दिवस हा यथावकाश जाहीर करण्यात येणार आहे.
सदरच्या महोत्सवाकरिंता प्रतिभा क्रिएशन्सचे अध्यक्ष ज्ञानेश बोंबलेकर , उपाध्यक्ष कन्हैय्या उत्पात , खजिनदार धनंजय मनमाडकर , महोत्सवद समन्वयक वासुदेव पुजारी यांच्यासह विशाल तपकिरे , संकेत कुलकर्णी , पदमनाभ देवडीकर , स्वप्निल जोशी , अमित उत्पात , गणेश हरिदास , विनया उत्पात , सचिन कुलकर्णी अनवलीकर , शशांक चिंचणीकर आदि परिश्रम घेत आहेत.

0 Comments