पंढरपूर (प्रतिनिधी):- राज्यातील ग्रामीण व शहरी पञकारांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात कारवाई करून पञकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी त्वरित होणेसाठी आपल्या पातळीवर पाठपुरावा करावा याबाबतचे निवेदन पत्रकार संरक्षण समिती, पंढरपूर च्या वतीने आमदार भारतनाना भालके यांना देण्यात आले.
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असून पञकार बांधव हे चौफेर घडत असलेल्या चालू घडामोडी योग्य रितीने, पारदर्शकपणे राज्यातील नागरिकांपुढे मांडण्याचे काम सातत्याने करित आहेत. परंतु काही समाज कंटक हे पञकारांनी छापलेल्या बातमीचा राग मनात धरून पञकारांवर किंवा कार्यालयावर हल्ले करित आहेत. यासंदर्भाचे राज्यातील जिवंत उदाहरण सांगायचे असल्यास परभणी जिल्हातील दै. लोकमत , दै. सामना या वृत्तपञाचे पञकार प्रवीण मुळी व प्रशांत मुळी यांच्या संपूर्ण कुटूंबिंयांना राञी झोपेतच पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर रायगड येथील शेकाप चे आमदार जयंत पाटील यांनी दै. लोकसत्ता या वृत्तपञाचे अलिबाग प्रतिनिधी हर्षद कशालकर यांच्यावर केलेला भ्याड हल्ला असे कित्येक हल्ले पञकारांवर होत आहेत.
पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व संस्थापक सचिव अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रातील आमदार, खासदार व मुख्यमंत्री यांना पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सध्या निवेदने देण्यात येत आहेत. पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना पहाता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पञकारितेचे अस्तित्व आपल्या राज्यात धोक्यात येत आहे. यासाठी आपण महाराष्ट्रातील राजकीय नेते मंडळींनी वरील विषयात जातीने लक्ष देऊन राज्यातील ग्रामीण व शहरी पञकारांच्या न्याय व हक्कासाठी पञकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी त्वरीत होणेसाठी आपापल्या पातळीवर पाठपुरावा करावा. अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आमदार भारतनाना भालके यांना निवेदन देताना पत्रकार संरक्षण समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे, पंढरपूर शहराध्यक्ष विरेंद्रसिंह उत्पात, सचिव संतोष कांबळे, सदस्य उमेश टोमके, लखन साळुंखे, शरद कारटकर आदी उपस्थित होते.








0 Comments