पंढरपूर शहरातील मार्केट यार्डात एका फटाक्याच्या गोडाऊनला आज रात्री सव्वा दहा ते साडे दहा च्या दरम्यान अचानक भीषण आग लागली असुन आग विझवण्याचे काम पंढरपूर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे जवान करत आहेत. या ठिकाणच्या अप्पा मुचलंबे यांच्या फटाका गोडाऊनला अचानक आग लागली असल्याची प्राथमिक माहिती पंढरपूर लाईव्हला मिळाली असुन या भीषण आगीमध्यहे कोणतीही जीवीत हाणी झाली नसल्याच्या प्राथमीक अंदाज आहे. आग लागल्याची घटना समजताच पंढरपूर नगरपरिषदचे अग्निशामक वाहन व जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन ही भीषण आग आटोक्यात आणण्याचे शर्थीते प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे सक्षम अधिकारी व कर्मचारीही दाखल झाले आहेत.





0 Comments