पंढरपूर-‘पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी देखील पर्वणी ठरत असलेले शिक्षण पंढरपूरच्या स्वेरीत मिळत असल्याचे जाणवले. येथील कार्य, विद्यार्थ्यांबरोबरचे संवाद, शिस्त, संस्कार, मिळणारे मार्गदर्शन खरोखरच अनुकरणीय आहे. हे महाविद्यालय महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला ही भूषण आहे. या ठिकाणी संशोधन केंद्र स्थापन करून भारताच्या विकासाला स्वेरीने हातभार लावला आहे.’ असे प्रतिपादन सोशल अल्फाचे श्रीकांत प्रभू यांनी केले.
         येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला सदिच्छा भेटीच्या निमित्ताने टाटा ट्रस्टचे विभागीय प्रमुख गणेश नीलम व सोशल अल्फाचे श्रीकांत प्रभू हे आले होते. यावेळी संपूर्ण कॅम्पसला भेट दिल्यानंतर श्रीकांत प्रभू आनंदित होवून प्रतिक्रिया देत होते. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी त्यांचे स्वागत करून संस्थेविषयी माहिती दिली. यावेळी गणेश नीलम व श्रीकांत प्रभू यांनी रुरल ह्युमन अॅण्ड रिसोर्स डेव्हलपमेन्ट फॅसिलीटेशन (आर.एच.आर.डी.एफ.) सेंटर व संशोधन विभागाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले की, ‘टाटा ट्रस्ट व सोशल अल्फा यांच्या प्रत्येक कार्यात व उपक्रमात स्वेरीचा हिरीरीने सहभाग असेल. स्वेरीची यशस्वी वाटचाल व त्याला मिळालेले उत्तुंग यश पाहून आलेले दोन्ही पाहुणे अत्यंत प्रभावित झाले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे डॉ. अजित पाटणकर, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, अभियांत्रिकी प्रवेश अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे, आर.एच.आर.डी.एफ.चे गजेंद्र कुलकर्णी, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.





-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com