श्री. विठ्ठल फार्मसीच्या दोघांची कंपनीसाठी कॅम्पस इंटव्हूवद्वारे निवड

 टीसीएसमध्ये आदित्य शेंडगे यांची तर पिरामल हेल्थ केअरमध्ये धनश्री कारंडे यांची झाली निवड
पंढरपूरः-येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टीटयूट संचलीत बी. फार्मसी महाविद्यालयातील दोघांची कॅम्पस इंटरव्यूव्हमधून निवड करण्यात आली असल्यची माहिती बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांनी दिली.
           टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीसाठी आदित्य शेंडगे याची तर पिरामल हेल्थ केअर या कंपनीत धनश्री कारंडे यांची निवड झाली आहे. दोन्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर त्यांची शिस्त व कंपनीसाठी आवश्यक असणारे गुण स्वेरीच्या विद्यार्थ्यांमध्ये आढळून आले त्यामुळे दोन वेगवेगळ्या कंपनीसाठी आदित्य शेंडगे व धनश्री कारंडे यांची निवड करण्यात आली. गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्तआदरयुक्त संस्कृती व उत्कृष्ठ शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावीत झाली. सन २००६ साली बी. फार्मसीची स्थापना झाली तेव्हापासून फार्मसीने अभियांत्रिकीच्या पाऊलांवर पाऊल टाकून यशस्वी वाटचाल करत आहे. 

प्रत्येक वर्षी परीक्षेमध्ये उत्कृष्ठ निकालविद्यार्थ्यांचे प्लेसमेंट होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ, शिस्त व संस्कार आदी महत्वाच्या बाबी स्वेरीतील विद्यार्थ्यांमध्ये रुजल्याचे दिसून येत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. अमित गंगवाल व बी.फार्मसीचे ट्रेनिग अॅण्ड प्लेसमेंट ऑफीसर डॉ. संजीवकुमार व डॉ. माधव राऊळ यांच्या नेतृत्वाखाली इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये देखील यश मिळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगेअध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडाउपाध्यक्ष आर. बी. रिसवडकरसंस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्ततसेच प्राचार्य डॉ. अमित गंगवाल,प्रा. आर.एस. नाईकनवरे, इतर प्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थ्यांनी व पालकांनी कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.





-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments